Sunday, 2 September 2018

रायरेश्वर मंदिर

सफर रायरेश्वराची

    पुण्याहून साताऱ्याकडे जाताना ५१ कि.मी. वर भोर आहे आणि भोर – आंकाडे २२ कि.मी. तेथून ८ कि.मी. असे एकूण ८१ कि.मी. वर १५०० मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर हे प्राचीन शिवस्थान आहे.
  भरपूर वर्षापासून सह्याद्री च्या डोंगररांगा,गड, किल्ले फिरलो पण ज्या "ऐतिहासिक" मंदिरामुळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या "रायरेश्वर" मंदिरात "हिंदवी स्वराज्याची शपथ" घेऊन हे सारे गड किल्ले स्वराज्यात सामील केले हे रायरेश्वराच्या आशीर्वादामुळे शक्य झाले असे पवित्र रायरेश्वर मंदिराच्या दर्शनाचा योग आला न्हवता.
बरेच वेळा हेलकावे देणारा हा ट्रेक आता करायचाच ठरवले,मग काय आम्ही मित्र मंडळी रायरेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याचेच ठरवले.

 24 जुलै 2018 ला आम्ही मित्र रायरेश्वरा कडे प्रस्थान केले.या वेळेस सर्वांनी आपल्या कामातून वेळ काढून हा ट्रेक करायचा ठरवले


फोटो मध्ये डावीकडून बँकर निलेश,मी आशिष,IT टीम लीडर पंकज,शास्त्रज्ञ स्वप्निल,बिल्डर सागर,आणि मध्ये आहे तो युवा नेते सुमीत भाऊ अशी आमच्या सहा जणांची टीम रायरेश्वरा कडे रवाना झाली.
वेळ सकाळची रोड पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि आम्ही मित्र पुन्हा एकदा सह्याद्रीच्या सफारी साठी सज्ज,पाऊसाचे दिवस असल्या मूळे गाड्यांचे वेग 40 ते 50 km होता,सकाळच्या नाष्टया साठी आम्ही हायवेला कापूरहोळ फाट्याला आनंद हॉटेल मध्ये थांबलो
सर्वांनी विविध प्रकारचे नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली


  
नेकलेस पॉईंट
नीरा नदीने भोर जवळ अर्ध वर्तुळाकार वळणा मुळे अप्रतिम दृश्य  नेकलेस सारखे दिसते.
Coordinates-18.185526,73.895779




      आंबवडे गावामधील झुलता पूल,ब्रिटिश कालीन पुल आहे त्यामुळे बांधकामा विषयी काही बोलायलाच नको पूल अजून ठन ठणीत आहे,1936 मध्ये हा पूल बांधण्यात आला त्या वेळी 10,000 रुपये खर्च आला होता
Coordinates - 18.071907,73.792179

नागेश्वर मंदिरात जाताना रस्त्यात एक वीरगळ आपणास दिसते,पुण्यात आल्यावर पुरातत्व विभागातील मित्राला या वीरगळ बद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की एक स्त्री सती गेल्या नंतर हि वीरगळ कोरली आहे.

आंबवडे गावामधील प्राचीन नागेश्वर मंदिर,हे मंदिर अत्यंत सुंदर आहे,


                           पंचगंगा कुंड
       पूर्वा पार पासून अशी एक कल्पना आहे कि श्री क्षेत्र महाबळेश्वर मधील ज्या पाच गंगा आहेत त्या या मंदिरा जवळील कुंडातून बाराही महिने 24 तास वाहतात,त्या मूळे या गावात कधी दुष्काळ पडत नाही , हे पाणी शेजारील 20 ते 25 गावांना पंम्पा द्वारे पोहाचावले जाते
    Coordinates - 18.072346,73.790647



पाऊसाचे दिवस असल्यामुळे तण / गवत वेचणी...... भात लावणी अगोदर....चालु होती
रायरेश्वर जवळ पोह्चण्या साठी हा डोगरतील रस्ता सर करावा लागतो,आता हे सगळं बगुन फोटो काढून झाल्यावर नॉन स्टॉप आमच्या गाड्या थेट रायरेश्वरा जवळ पोहचल्या .



रायरेश्वर मंदिरात जाण्यासाठी मार्ग पुढील प्रमाणे






या लोखंडी शिडी पासून सूर्योदय आणि सूर्यास्तचा नजारा पाहण्या सारखा आहे
या सर्व वाटा सर करून आपण वर पठारावर पोहचतो,पठारा पर्यंत पोहचण्यासाठी चा जो काही अनुभव आहे तो शब्दांच्या पलीकडले आहे,या निसर्गा साठी माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत प्रत्येकानी एकदा तरी रायरेश्वरा कडे येऊन हा अनुभव घ्यावा असे माझे मत आहे

 रायरेश्वर किल्ल्याचा माहिती फलक

गो मुख तळे
या तळ्याचे वैशिष्ट्य असे कि रायरेश्वराच्या मंदिरा मध्ये जी शंकराची पिंड आहे त्या खालून  जो पाण्याचा उगम
आहे तो या गो मुखा द्वारे विसर्ग होती,हे गो मुख तळे पांडव कालीन आहे,आजवर हा पाण्याचा स्रोत कधी खंडित झालेला नाही,किल्ल्यावर जी 30 ते 40 कुटुंब आहेत ते यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.

रायरेश्वर मंदिर
हीच ती पवित्र जागा जिथे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती......
मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे,आणि हे मंदिर पांडव कालीन आहे
             Coordinates-18.046362,73.720705




महादेवाचे दर्शन घेऊन,मंदिराच्या गाभाऱ्यात थोडा वेळ घालवला,मंदिराचे जुने पण बगताना आपण पण इतिहासात कधी हरवून जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही
दर्शन घेऊन बाहेर शेड मध्ये जरा विसावा साठी आम्ही थांबलो थोडिफार पोट पूजा केली,अन तेवढ्यात लहान मुल खेळायला आली

 मुलं खेळून झाल्यावर शेजार असलेल्या वाड्यात गेली,आम्ही पण कुतूहलाने आत मध्ये डोकावून बघितल्यावर समजले कि गुरुजी मुलांकडून पाढे म्हणून घेत आहेत,
शाळेतील मास्तरांन सोबत आम्ही शाळे बद्दल विचारले तर आम्हाला कळले कि सर्व भारत शिक्षण अभियाना अंतर्गत 2001 साली या शाळेची या किल्ल्यावर सुरवात झाली,
आणि महत्वाचे म्हणजे शाळे मधील शिक्षक हे भोर मधून रोज येऊन जाऊन करतात, किल्ल्यावर जाण्यासाठी काही शासकीय सेवा उपलब्ध नाहीत तरी सुद्धा रोज पायी गड उतरण चढणे हा खटा टोप फक्त मुलांना ज्ञान देण्यासाठी,अशा शिक्षकांन मुळेच भारताचे भविष्यात नाव अजून उंच होणार या सर्व शिक्षकांना माझा मनाचा मुजरा.....
कास पठारावर जी फुले असतात ती सगळी फुले रायरेश्वर पठारावर आपण गणपतीझाल्यावर पाहण्यास मिळतात,हे पठार सुमारे 16km लांबीचे आहे,या पठारावर 7 विविध प्रकारच्या माती असल्यामुळे दुसऱ्या कास ची निर्मिती येथे झाली

पाऊसा मुळे सर्व काही पाहता येणे शक्य न्हवते तरी जेवढे काही बगता येईल तेवढे बघितले आणि परतीच्या प्रवासाला आम्ही सुरवात केली रस्त्यात फोटोसेशन आम्ही केले









रायरेश्वरावर पश्चिमेकडे नखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंड आणि अस्वल खिंड रोमांच उभे करणारे दृश्य बघण्या सारखे आहे वेळे अभावी आम्ही बघू शकलो नाही...असो... पुढच्या वेळी पुन्हा येऊ असे ठरवून आम्ही रायरेश्वराचा निरोप घेतला अन नॉन स्टॉप पुणे गाठलं,जिथून ट्रेक ला सुरवात झालती म्हणजे मोहन नगर ला रात्री 8 वाजता चहा घेत दिवस भरातील न विसरणाऱ्यनी क्षणांचाआढावा घेत निरोप घेतला.

आता ह्या लिमन चा फोटो इथं कसं काय संबंध हा तर ट्रेक ला न्हवता मग ...  
एक सकाळचा किस्सा लिहायचं राहून गेला...उशिरा फोटो मिळाल्या मूळे आणि सर्व काही लिहून झाल्यामुळे अपरिहार्य शेवट लिहीत आहे
आम्ही ट्रेक साठी निघतांना एका ट्रेकर दुखी मनाने ऑफिस ला जाताना, आपण यांना ओळखत असालच,आपल्या सोबत सर्व ट्रेक ला असायचे,असायचे म्हणजे अजून जिवंत आहे,लिमन नाव आहे याचं,या पठयाने या ट्रेक चे आयोजन केलते, पण नवीन जॉब मूळे येऊ शकला नाही असो काही हरकत नाही पुढच्या वेळेस नक्की येणार म्हणून ऑफिस ला निघून गेला
सर्व फोटोचे श्रेय सर्वाना जाते,आणि धन्यवाद मित्रानो तुमच्या सर्वांच्या सोबती मुळे हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण झाला...

अशी ही आमची रायरेश्वराची सफर .....!!!!
लेखनात काही चूक असल्यास क्षमा असावी ....

वेळ काढून वाचल्या बद्दल आभार ...!!!